प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे तर्फे विशेष सुपरफास्ट ट्रेन

0

भुसावळ (प्रतिनिधी) आगामी सणासुदीचे दिवस  व प्रवाशांची गर्दी पाहता मध्य रेल्वेने विशेष सुपर फास्ट सामान्य ट्रेन चालविण्याचा निर्णय  घेतला आहे.

विशेष सुपरफास्ट ट्रेन पुढील प्रमाणे – रेल्वे ट्रेन क्रमांक – 01270 अप नागपूर – पुणे (एकेरी मार्ग) ही विशेष गडी मंगळवारी 8 ऑ़क़्टोबर रोजी नागपूर येथून 23.00 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी 17.10 वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीला पुढील स्थानकावर थांबा असेल – अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर दौंड.

ट्रेन क्रमांक – 01272 यूपी नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी नागपूरहून बुधवार दि. 9 ऑक्टोबर रोजी   12.15 वाजता प्रस्थान करेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर गुरुवारी दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी  पोहोचेल.

ट्रेन  क्रमांक – 01273 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शुक्रवार दि 11 ऑ़क़्टोबर   रोजी 23.05 वाजता सुटेल आणि शनिवारी नागपूरला 14.30 वाजता पोहोचेल. ही गाडी अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे येथे थांबेल.

ट्रेन क्रमांक – 02115 डाऊन मुंबई – अजनी ही ट्रेन मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी  00.20  वाजता सुटून अजनीला 15.00 वाजता अजनीला  पोहोचेल.

ट्रेन क्रमांक – 02116 अप अजनी – मुंबई ही गाडी बुधवारी  दि. 9 ऑ़क़्टोबर रोजी अजनी येथून 23.05  वाजता सुटेल व गुरुवारी मुंबईला 13.50 वाजता पोहोचेल. ही गाडी अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे येथे थांबेल.

Leave A Reply

Your email address will not be published.