विवाहितेला मारहाण करत विनयभंग; आठ जणांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी आठ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात राहणारी  (वय २२) विवाहित आपल्या कुटुंबीयांसह राहते. 17 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील रामनगर येथील रहिवासी दया खामकर, बाजीराव खामकर, खंडू देसले, वंदना खामकर, सोनी बाजीराव खामकर, त्रिशा, वैशाली (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी विवाहिता दांडिया खेळत असताना धक्का लागल्याने वरील आठ जणांनी शिवीगाळ करून मारहाण करत विनयभंग केला.

याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल फारूक तडवी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.