विद्यार्थ्यांना दिलासा ; बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ

0

नागपूर : करोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या जीवनावर खूपच प्रभाव पडला. कारण त्यांचे विद्यार्थी जीवन पूर्णतः विस्कळीत झाले. काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्या तर काहींच्या परीक्षा रद्दच झाल्या. परंतु, आता कर ना जरा नियंत्रणात आल्या नंतर आता शिक्षण संस्था पुन्हा सुरु झाल्या. काही दिवसांपूर्वी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तारखा शासनाकडून जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु झाली.

 

या प्रकियेसाठी २०२१ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता नियमित विद्यार्थ्यांना २८ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. तर २९ जानेवारीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. मंडळाने १५ डिसेंबरपासून परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली. ४ जानेवारीपर्यंत अखेरची तिथी होती. त्यानंतर पुन्हा १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली गेली. आतापून्हा २८ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.