वाहनाच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्याच्या हद्दीत असलेल्या आमोदा ते घार्डी रोडवरील विट भट्टीजवळ एका वृद्ध महिलेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ डिसेंबर रोजी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील आमोदा ते घार्डीरोड दरम्यान दिलीप कुंभार यांच्या वीटभट्टीसमोर अज्ञात वाहनाने ७५ वर्षीय वृध्द महिलेला जोरदार धडक देऊन पसार झाला होता. या धडकेत वृध्द महिला जागीच ठार झाल्या होत्या.

याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी वृद्ध महिलेच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान मयत महिलेची ओळख पटली आहे. सदर महिला खाटीकवाडा, यावल जि.जळगाव येथील नजमाबी वाहद कदर शेख असून मेहबूब खाटीक यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकांविरोधात रविवारी १९ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.