वाणेगांव पोलीस पाटलाची कोरोना रोखण्यासाठी जनजागृती

0

पाचोरा | प्रतिनिधी

सद्या चालू असलेल्या कोरोना विषाणू मुळे वाणेगांव ता.पाचोरा येथिल पोलिस पाटील नितीन जमदाडे यांचे योगदान मोलाचे ठरत आहे. आपल्या गावांतील आणि परिसरातील नागरिक कोरोना सारख्या कोणत्याही  प्रकारच्या आजाराला बळी पडू नये म्हणून यासाठी ते रात्रंदिवस गावाच्या सेवेमध्ये असलेल्या या त्यांच्या कार्यास मनापासून सलाम आहे. अशा या जीवघेण्या आजारापासून लढण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेडिकल किट नसतांना स्वतः च्या जीवाची पर्वा न करता सर्व जनतेला घरामध्ये सुखरूप ठेवून स्वतः मात्र रस्त्यावर, गल्लोगल्ली कार्यरत राहून लोकांना काळजी घेण्यासाठी आवाहन करीत आहेत..आपल्या गावासाठी ते आपले काम चोखपणे पार पाडत आहेत. गावात गर्दी होवू न देणे, गर्दी असलेल्या ठिकाणी जाऊन ती गर्दी हटवून कोरोना जनजागृती ते चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. गावात दिल्ली, मुंबई, नागपूर, पूणे ,सुरत अशा बाहेरून आलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांची नोंदणी करून वैद्यकिय तपासणी करण्याचे त्यांचे कार्य महत्त्व पूर्ण ठरत आहे, विविध बसण्याचे कट्टे व चौक यावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. गावात दवंडी देणे, प्रसंगी स्वतः गावात लाऊडस्पीकर वर जनजागृती करणे, गावातील दारूबंदी करणे, स्वतः घरोघरी जाऊन स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगीतले, हात धुण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी त्यांना गावातील काही व्यक्ती चा रोष ही पत्करावा लागत आहे. पण आपल्या गावांसाठी आणि देशासाठी ते आपले प्रशासकीय कर्तव्य निभावत आहेत. कोरोना आपल्या गावात पसरू नये यासाठी आपले वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी देतील त्या सूचनांचे पालन करण्यात ते मग्न असतात. कोरोना आजाराची आजची परिस्थिती बदलण्यासाठी  सगळ्यांनी साथ देण्याची गरज आहे. लाॅकडाऊन जनजागृती, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर, हँड वॉश, व्यक्तीगत स्वच्छता ठेवावी तसेच कायदा व सुव्यवस्था संदर्भात आदेश पाळावा. असे आवाहन ते वारंवार लोकांना करत आहेत. गावात ग्रामपंचायत मार्फत तीन वेळा जंतूनाशक फवारणी सुद्धा करण्यात आली असून याकामी  ग्रामसेवक नंदकिशोर पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी अप्सर तडवी ,मनोज पाटील आणि सुकदेव आव्हाड यांचेही सहकार्य लाभत आहे.

फक्त माझे वाणेगांव आणि परिसर कोरोना मुक्त राहावे हिच नितीन जमदाडेंची तळमळ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.