प्रहार भडगाव तर्फे शहरात ३५०० मास्क वाटप व जंतुनाशक फवारणी

0

भडगाव | प्रतिनिधी

प्रहार जनशक्ती पक्ष जळगाव व जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले यांच्या स्वखर्चाने भडगाव शहरात व संपूर्ण वार्ड क्र.१६ मधे सरसकट ३५०० मास्क वाटप करण्यात आले मास्क वाटप करतांना चेहरे बघून किंवा फक्त ओळखीचे घर बघून वाटप न करता प्रत्येकाच्या घरी जाऊन सरसकट मास्क वाटप करण्यात आले व कोरोना विषयी जनजागृती करण्यात येऊन जंतुनाशक फवारणी करण्यात आली .

फवारणी करतांना प्रत्येक घराच्या चौफेर , बखळ प्लॉट व प्रत्येक कॉलनीचे मोकळे पटांगण तसेच उकिरडा , गटारी, पाण्याची डबके यावर नागरिकांना बोलावून त्यांना हवी तशी फवारणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी करून दिली.

पोलिस वसाहतीत सुद्धा फवारणी

जीवाची बाजी लावून जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्या पोलिस बांधवांच्या वसाहतीकडे कोणाचेही लक्ष नसतांना तेथे प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले व सर्व कार्यकर्ते यांनी स्वतः संपूर्ण वसाहतीच्या चौफेर तसेच आजूबाजूला व इमारतीला बाहेरून व मधून देखील दमदार फवारणी करून ईमारत जणू न्हाऊनच काढली व त्यांचे संरक्षण केले. या सर्व उपक्रमास उज्ज्वल कॉलनी , आई भवानी , बाप्पा गणेश , सत्य साई , स्वामी गणेश , शिवाजी नगर , शिवशक्ती , गुरुदत्त मिञ मंडळ येथील कार्यकर्ते व नागरिक देखील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.