वाढीव वीजबिलांबाबत जनतेला दिवाळीपर्यंत गोड बातमी – ऊर्जामंत्री नितीन राऊत

0

मुंबई | कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला वाढीव वीजबिल आले होते. यासंदर्भात जनतेला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे. वाढीव वीजबिलांबाबतीत येत्या दिवाळीपर्यंत नागरिकांना लवकरच गोड बातमी मिळेल,” असे संकेत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.

“0 ते 100 युनिटपर्यत वीज फ्री देण्याबाबत मी ऊर्जामंत्री म्हणून सांगितलं आहे. मात्र त्यावर अर्थमंत्री म्हणून अजित पवार बोलतील. तसेच माझ्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच मी त्यावर आणखी योग्य भाष्य करेन. यंदा दिवाळीत नागरिकांना नक्कीच सप्रेम भेट मिळेल,” अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली.

मी ऊर्जामंत्री झाल्यापासून ० ते १०० युनिट वीज मोफत देण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहे.  त्यासंदर्भातील नियाेजन करण्यात येत आहे. वीजपुरवठा करणाऱ्या तीन कंपन्यांमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही अडथळ्याविना सलग ४ तास व्यवस्थित वीजपुरवठा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.