वाचकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

0

            जळगाव, दि. 14 – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रसिद्ध केलेला ‘महाराष्ट्र वार्षिकी 2017’ हा संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासकांना उपयुक्त ठरणार आहे. या संदर्भ ग्रंथाच्या खरेदीला जिल्ह्यातील वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या ग्रंथाच्या अवघ्या काही प्रती जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथे शिल्लक राहिल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र वार्षिकी 2017 च्या खरेदीसाठी तत्काळ कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

            महाराष्ट्र वार्षिकी 2017 हा संदर्भ ग्रंथ स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, शासकीय- निमशासकीय कार्यालये, अभ्यासक, ग्रंथालये, पत्रकार, राजकीय नेते, सामान्य ज्ञानाची आवड असणारे सर्व वयोगटातील नागरिक यांना उपयुक्त ठरणार असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी दिली आहे.
महाराष्ट्र वार्षिकी 2017 या संदर्भ ग्रंथात महाराष्ट्राविषयी अधिकृत, वस्तूनिष्ठ व एकत्रित माहितीचा समावेश आहे. महाराष्ट्राची भूमी आणि लोक, राज्याची भौतिक वैशिष्ट्ये, भौगोलिक स्थिती, इतिहास, वन्यजीवन, संस्कृती, महाराष्ट्राविषयी सांख्यिकी स्वरुपाच्या बाबी, पर्यटन, उद्योग, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, रोजगार आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यांची सांख्यिकी माहिती, वैशिष्ट्ये, शिक्षणसंस्था, सिंचन प्रकल्प, कृषी उद्योग, पर्यटन स्थळे आदी माहितीचा समावेश आहे.

            राज्य शासनाच्या विविध विभागांची सविस्तर माहिती, विभागांचे उद्देश व कार्य, रचना, महत्त्वाच्या योजना, संपर्क क्रमांक व मंत्रीमंडळ निर्णय, महत्त्वाच्या शासकीय घटना, घडामोडी, उपक्रम, कार्यक्रम, पुरस्कार, महाराष्ट्राची मानचिन्हे, महाराष्ट्रातील भारतरत्न व महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर, राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यपाल तसेच विधीमंडळ सदस्य आणि केंद्रीय व राज्य मंत्रीमंडळ, देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान, राज्यातील लोकसभा व राज्यसभा सदस्य यांचाही समावेश आहे.
महाराष्ट्र वार्षिकी 2017 या संदर्भ ग्रंथाची किंमत फक्त तीनशे रुपये असून जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. विद्यार्थी, वाचक व अभ्यासकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.