वर्डी येथे दोन ठिकाणी घरात धाडसी चोरी

0

वर्डी ता चोपडा (वार्ताहर) : येथे १६ मार्च रोजी रात्री दोन घरांच्या कडी कोंडा तोडून चोरट्यांनी मौल्यवान वस्तू व दागिने चोरून नेले.

१६ मार्च रोजी रात्री संतोषी मातानगर मधील सुनील उत्तम पाटील व्यवसाय शेती व शेजारील रघुनाथ रामकृष्ण पाटील दोघांचे व्यवसाय शेती असून, सुनील पाटील हे कुटुंबासह बाहेर अंगणात झोपले असताना तसेच रघुनाथ पाटील हे बाहेरगावी गेल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेले.

पोलिस पाटील यांच्या खबरी वरून अडावद पोलिस स्टेशन चे अधिकारी घटना स्थळी दाखल झाले पुढील तपास करत आहे दोघांच्या घरातील चार लाख 11 हजार रुपये पर्यंत चोरीच्या अंदाज पोलिसांनी पंचनाम्यात नमूद करून अज्ञात विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तपासणीसाठी श्वान पथक व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास पोलीस कर्मचारी एपीआय किरण दांडगे, पी एसआय डी एन बयास ,बीट हवलदार बाविस्कर,एरणवडे,तडवी सह तपास करीत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.