कोरोनाचा कहर ; जामनेर तालुक्यात आज 179 रुग्ण पॉझिटिव्ह

0

शहरात 71 तर ग्रामीण भागातील 108 रुग्णांचा समावेश …
जामनेर(प्रतिनिधी):- तालुक्यात ऐकुण 1009 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून जामनेर शहरात 478 व ग्रामीण भागातील 531 रुग्ण आहेत.यापैकी 25 रुग्ण कोव्हिडं केयर सेंटर पळासखेडा येथे दाखल आहेत व 32 रुग्ण हे उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे दाखल आहेत त्यापैकी 26 रुग्णांना ऑक्सिजन ची गरज भासत आहे.18 रुग्ण जळगांव येथे खाजगी दवाखान्यात दाखल आहेत. तर 935 रुग्ण हे होम कोरन्टीन आहेत.

जामनेर तालुक्यात संसर्ग झपाट्याने वाढत आहे तरी सर्व नागरिकांनी कोव्हिडं नियमांचे पालन करावे व कोणत्याही प्रकारची लक्षणे असल्यास किंवा पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी.
जामनेर तालुक्यात सर्व शासकीय रुग्णालयात तसेच खाजगी रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर यांच्या दवाखान्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्तीत मोफत कोरोना चाचणी करण्यात येते. तरी नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभाग व प्रशासनाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी नागरिकांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.