वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र परत न दिल्यास जेलभरो आंदोलन ; नगराध्यक्ष सुनील काळे

0

वरणगाव (प्रतिनिधी) : आज भारतीय जनता पार्टीतर्फे हातनूर येथे वरणगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर 1999 मध्ये युती सरकार असतांना उपमुख्यमंत्री स्व गोपीनाथ मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले तत्कालीन पालकमंत्री ना एकनाथराव खडसे उपस्तिथ संपन्न झाले होते.

1999 नंतर 15 वर्ष राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सरकार होतो राजकीय आकसा पोटी मंजूर पोलीस प्रशिक्षणकेंद्राला ला निधी दिला नाही. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माजी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी 135 कोटी रुपये या प्रशिक्षण केंद्राला 7 ऑगस्ट 2019 ला मंजूर करून घेतले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि राजकीय आकसापोटी वरणगाव चे मंजूर पोलीस प्रशिक्षण केंद्र जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार यांनी पळविले त्या निषेधार्थ आज वरणगाव येथे स्व गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा लावून पूजन करून निदर्शने केली.

यावेळी मंजूर राज्य राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र परत न दिल्यास जेलभरो आंदोलनचा इशारा नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला. यावेळी भाजपा नेते अल्लउद्दीन सेठ, शामराव धनगर, सुनील माळी, गोलू राणे, नटराज चौधरी, रमेश पालवे, हितेश चौधरी, आकाश निमकर, संजय सोनार आदि होते.

Leave A Reply

Your email address will not be published.