कृषि दिनानिमित्त मौजे खादगाव येथे कृषि संजिवनी सप्ताहाचे आयोजन

0

जामनेर (प्रतिनीधी):- मा.मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व कृषि दिनानिमित्त कृषि विभाग व नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प जामनेर यांच्या संयुक्त विद्यामानाने ” कृषि संजिवनी सप्ताह ” दि १ जुलै ते ७ जुलै अंतर्गत कृषि दिन मौजे खादगाव येथे सोशल डिस्टंसिंग चे पालन करुन साजरा करण्यात आला.तसेच उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना मास वितरण करण्यात आले. या कृषिदिनानिमीत्त तालुका कृषि अधिकारी मा.अभिमन्यू चोपडे ,कृषि पर्वेक्षक यु.टी.गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम कृषि संजीवनी समिती खादगाव येथील सर्व सदस्य व गावातील शेतकरी यांचे वैद्यकीय अधिकारी डाँ.विनोद भोई यांनी थर्माल स्किंनीग मशिनद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली.व कोविड-१९ विषयी जनजागृती करण्यात आली.कृषि सहाय्यक मिलींद पाटील यांनी उपस्थितीतांना बी.बी.एफ ने पेरणी,बी.बी.एफ तंत्रज्ञानाचा व वापर रंद वाफा व सरी तंत्रज्ञानाचे फायदे,एकात्मिक किड व्यवस्थापन, किड सर्वेक्षण अंतर्गत कामगंध सापळे वापर करणे, पिकात पक्षी थांबे लावणे,तसेच पाण्याचा ताळेबंद समजावून सांगणे तसेच प्रत्येक्ष शेतावर जाऊन शेतीविषयक गटचर्चा करण्यात आली.शेतकऱ्यांचे शंका व अडचणीचे निरासन करण्यात आले.

समुह सहाय्यक रुपेश बिऱ्हाडे यांनी नानाजी देशमुख कृषि संजिवनी समितीची सविस्तर माहिती देण्यात आली.व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग घेण्याविषयी सुचविले. व कृषि संजिवनी सप्ताहाचे नियोजन कशा पद्धतीने असेल.असे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तसेच कृषि विभाग आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धा सहभागी विषयी आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाचा समारोप ग्राम कृषि संजिवनी समिती अध्यक्ष सौ.ज्योती संदिप चौधरी व इतर मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन समारोप करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.