तामसवाडीच्या क्वारंटाईन असलेल्या युवकांची क्वांरंटाईन सेंटरमध्ये धमाल

0

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील तामसवाडी येथील युवक हा धुळे येथे बाधित आढळल्याने त्यांच्या संपर्कातील ६५ जणांना सप्तर्षी मंगल कार्यालयात क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र ह्या युवकांना क्वारंटाईन कार्यालयात चक्क गाण्यावर नाचून धमाल केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली असुन या युवकांविरूद्ध पारोळा पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.

पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील युवक हा धुळे येथे बाधित आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या युवकांना क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासन गाड्याच्या ताफायासह तामसवाडी गांवात पोहचल्या नंतर बाधितांच्या संपर्कात आलेल्या एका – एका जनाचे नांवे वाचुन गाडयां मध्ये बसविले जात असतांना प्रशासनाची दमछक झाली होत.

दि २९ रोजी दुपारी सप्तर्षी मंगल कार्यालयात ६५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते . एकाच गावांचे आणि सर्व युवकच असल्याने ह्या पैकी काहि युवकांनी तरी आज दुपारी सप्तर्षी कार्यालयात चारीही बाजुने गोल करुन मधोमध एका युवकांस … पीरतीच्या … झुल्यात … झुलवा … राया पीरतीच्या…. झुलव्यात झुलवा …. अन …. इशकांच्या गुलंकुंद खिलवा ह्या मराठी चित्रपटाच्या गाण्यावर
अक्षरश्या धमाल केल्याचा व्हिडिओ टिकटॉक वर व्हायरल झाल्याने प्रशासनाने याची त्वरीत दरवंल घेऊन त्या युवकां वर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Leave A Reply

Your email address will not be published.