वरगव्हान जि.प मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी हफिजा निसार तडवी यांची निवड

0

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चोपडा ता. तालुक्यातील धानो-यापासुन काही कि.मी अतंरावर असलेले  जि.प.मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन  समितीची नुकतीच निवड करण्यात आली. तसेच अध्यक्ष पदाची निवड झालेली असुन त्यामध्ये हफिजा निसार तडवी यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली.

सचिव तय्यब नबाब तडवी, लतीब मैताब तडवी, विकास हिरामण पाटील, रतन बारेला, धर्मा बारेला, ममताज तडवी, कविता बाविस्कर,  संजय तडवी, नजमा तडवी, तसेच हफिजा निसार तडवी यांची  निवड अध्यक्ष पदी बिनविरोध घोषीत करण्यात आले.  सरपंच भूषण पाटील, ग्रा.पं सदस्य रविद्र पाटील, गाव माझा न्युज चॅनलचे  चिप ब्युरो महेद्र पाटील, दिनेश सोनार, माजी सरपंच नेमीचंद सोनार तसेच शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन केले व आभार हैदर तडवी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.