कजगाव येथे अकराशे लोकांनी घेतला कोरोना लसीचा लाभ

0

कजगाव, ता. भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

येथे कोरोना लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्यात आले. कजगाव पत्रकार बांधव व ग्रामपंचायतच्या वतीने व आरोग्य केंद्राच्या सहकार्याने कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.  शिबिरात कजगाव व परिसरातील तब्बल अकराशे लोकांनी लस घेतली कजगाव येथे आतापर्यंत येवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जिल्हा परिषद शाळेत झालेल्या लसीकरणाला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन लसीकरणाचा लाभ घेतला गेल्या.  अनेक दिवसांपासून कजगाव ग्रामस्थांची मागणी होती की गावात भव्य कोरोना लसीकरण शिबीराचे आयोजन करावे, अखेर कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, सरपंच पती दिनेश पाटील, पत्रकार नीतीन सोनार यांच्या संयुक्तिक प्रयत्नाने लसीकरण यशस्वी करण्यात आले.

आरोग्य प्रशासन पत्रकार बांधव व ग्रापंचयात यांच्या यशस्वी प्रयत्नाचे कजगाव ग्रामस्थांनी समाधान मानले आहे. यावेळी कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, सरपंच पती दिनेश पाटील, पत्रकार प्रमोद ललवाणी, संजय महाजन, नितीन सोनार, प्रशांत पाटील, अमीन पिंजारी, दिपक अमृतकर, लालसिंग पाटील, पोलीस कॉन्स्टेबल, विजय पाटील, प्रकाश गवळी, आरोग्य कर्मचारी विजय दाभाळे, रोहित महाले, नलू परदेशी, सुवर्णा मोरे, कांता मोरे, सुरेख गढरी, जि. प. कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुनील महाजन, शिक्षक सुनील गायकवाड, प्रवीण महाजन, कर्तार पाटील, धर्मराज पाटील,  ग्रामपंचायत कर्मचारी सुनील पवार, रघुनाथ जाधव, रवींद्र मालचे, भुरा सोनवणे, संजय पाटील, स्वयंसेवक आशिष वाणी, सारंग राजपूत, हर्षल महाजन, मयूर गुजराथी, नीरज धाडीवाल, रतन महाजन, विजय गायकवाड, अंगणवाडी सेविका सुनंदा महाजन, अर्चना महाजन, शीतल विसपुते, मीना पगारे, विजया तिवारी, विमल महाजन, छाया महाजन, लता शिरसाठ, शारदा बोरसे व कजगाव ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.