आदिवासी विकास विभागात शिक्षक भरतीची मागणी

0

सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आदिवासी विकास विभागात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे शासकीय आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणून ही पद भरती तात्काळ करण्यात यावी ,अशी मागणी निवेदनाद्वारे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण धारकांनी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे केली आहे.

भावी शिक्षक शासनाच्या नियमानुसार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. परंतु आज रोजी अनेक भावी शिक्षक बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहेत. दुसरी शिक्षक अभियोगीता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात यावी. अशी मागणी केली आहे. झिरवाळ यांनी सांगितले की,  शिक्षक पद भरती करण्यासाठी शासन दरबारी दिलेल्या शिक्षक भरती संदर्भात त्वरीत दखल घेतली जाईल. असे त्यांनी आश्वासन दिले.

निवेदन सादर करण्यासाठी  मनोहर गुंबाडे, दौलत जाधव, अर्जुन भोये, अनिल भुसारे, हरिष अलबाड, पुंडलिक टोपले, चंद्रशेखर धुम, रमेश जोपळे, हेमंत चौधरी, रंजना गावित, परशुराम बिरारी, सह आदी पात्र धारक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.