वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी स्वीकारला हिंदू धर्म..

0

लखनऊ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उत्तर प्रदेशच्या वक्फ बोर्डाचे प्रमुख वसीम रिझवी यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. सोमवारी गाझियाबाद येथे यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत त्यांनी सनातन धर्माचा स्वीकार केला आहे.

‘मला इस्लाममधून बेदखल करण्यात आले आहे. माझ्यावर दर शुक्रवारी इनाम जाहीर केले जाते. आज मी सनातन धर्माचा स्वीकार करत आहे’, असं वसीम रिझवी यावेळी म्हणाले आहेत.

तसेच काही जण माझ्या जिवावर उठले आहेत आणि आपल्या मृत्युनंतर ते आपले पार्थिव कुठल्याही दफनभूमीत दफन करू देणार नाहीत, असे म्हणत वसीम रिझवी यांनी हिंदू धर्मानुसार आपले अंत्यसंस्कार व्हावेत, अशी मागणी आपल्या मृत्युपत्रातून केली आहे.

वसीम रिझवी यांनी यापूर्वीच या धर्मांतर करणार असल्याची घोषणा केली होती. वसीम रिझवी हे उत्तर प्रदेशच्या शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपले मृत्युपत्र सार्वजनिकरित्या जाहीर केले होते. त्या मृत्युपत्रामध्ये त्यांनी मृत्युनंतर आपल्याला दफन करण्याऐवजी हिंदू पद्धतीने दहन करावे. यती नरसिंहानंद यांनीच आपल्या चितेला अग्नी द्यावा, असे वसीम रिझवी म्हणाले आहेत.

वसीम रिझवी हे काही काळापूर्वी इस्लाममधील सुधारणांसाठी याचिकाकर्ते म्हणून चर्चेत आले होते. इस्लाममध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यातील 26 आयत (कुराणातील श्लोक) हटवण्यात यावेत या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या याचिकेनंतर अनेक मुस्लिम संघटनांनी वसीम रिझवी यांना लक्ष्य केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.