लोहारा येथील पत्रकार मंचतर्फे अ. भा.ग्रा.पत्रकार संघाच्या संघटकपदी दिनेश चौधरी

0

लोहारा (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील पत्रकार मंच तर्फे येथील दै.स्वतंत्र भारतचे प्रतिनिधी दिनेश चौधरी  यांनी अ. भा.ग्रा.पत्रकार संघाच्या संघटक पदी ,तर अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या जळगांव जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचा सत्काराचा कार्यक्रम करण्यात आला.

लोहारा शहर पत्रकार मंचचे अध्यक्ष महेंद्र शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच कळमसरा येथील जेष्ठ पत्रकार युवराज पाटील यांचा ही अखिल पत्रकार कल्याण संस्थेच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचाही सत्कार  येथील पत्रकार कृष्णराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र शेळके,कृष्णराव शेळके,दीपक पवार, रमेश शेळके,ईश्वर खरे, दिलीप चौधरी, आबा चौधरी, नाना चौधरी, व युवराज चौधरी हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.