रेल्वेतुन पडलेल्या जखमी प्रवाशासाठी चक्क रेल्वे धावली २ कि.मी. मागे

0

– रेल्वे प्रशासन व ट्रेन लाईव्ह संघटनेने घडविले माणुसकीचे दर्शन

पाचोरा (प्रतिनिधी) :  दि. ६ रोजी ५११८१ देवळाली भुसावळ शटल मधुन रोजच्या अप – डाऊन मधील राहुल संजय पाटील (वय – २२) हा विद्यार्थी जळगांव येथे आय. एम. आर. काॅलेज मधे शिक्षण घेत आहे. राहुल हा दि. ६ रोजी पॅसेंजर (क्रं.५११८१) मध्ये गर्दित चढला व माहेजी जवळील रेल्वे खंबा नं. ३८३ जवळ धावत्या रेल्वेतून पडला. व गंभीर जखमी झाला. या घटनेबाबत तात्काळ ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेच्या सदस्यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप पाटील यांना कळविले. पाटील यांनी पाचोरा स्टेशन प्रबंधक एस. टी. जाधव यांना घटनेबाबत माहिती दिली असता जाधव यांनी परधाडे येथील सहाय्यक स्टेशन मास्टर के. जे. बर्डे व माहेजी येथील सहाय्यक स्टेशन मास्टर ए. एस. पाल यांचेशी संपर्क करुन आर.पी.एफ. विभागालाही याबाबत माहिती दिल्यानंतर पॅसेंजर थांबविण्यात आली. गार्ड व ड्राईवर यांनी आपसांत चर्चा करून चौकशी केली.  संघटनेकडून  प्रशासनाला कळविण्यात आल्याने त्यांनीही ड्राईवरला विनंती आदेश केलेत. यावेळी प्रशासनाने माणसाची किंमत ठेवत देवळाली – देवळाली शटल चक्क एक ते दिड कि. मी. मागे घेत रेल्वे लाईन वर जखमी अवस्थेत पडलेल्या राहुल यास पॅसेंजरमध्ये बसविले. पुढील म्हसावद स्टेशनवर प्रथोमउपचार करण्यात येऊन पुढे उपचारासाठी रवाना करण्यात आले. परधाडे – माहेजी दरम्यान रोजच्या वाढत्यागर्दी मुळे व ११०३९ महाराष्ट्र एक्सप्रेस रोजच ३ ते ४ तास उशिरा धावत असल्यामुळे व पर्यायी रेल्वे नसल्याने शटलचा सहारा सर्वच प्रवासी व नियमित ये – जा करणारे प्रवाशी घेतात. यामुळे अवाजवी गर्दी देवलाली – भुसावळ या पॅसेंजर मध्ये होते. व त्यातून असे अपघात नित्याचेच होत असल्याने रेल्वे प्रशासनाने यावर उपाय काढणे गरजेचे आहे.

ट्रेन मागे घेण्यात आल्याने व संबंधिताला वाचविण्यात यश आल्याने रेल्वे ड्रायव्हर, गार्ड, व पाचोरा रेल्वे प्रशासनाचे आभार प्रवासी वर्गातून मानण्यात आले. व अशा गर्दीला पर्याय म्हणून रेल्वे गाड्या वेळेवर धावणे, शटल ला वाढीव कोच जोडणे, स्वतंत्र एम.एस.टी. कोच जोडणे, याबाबत तात्काळ पाऊल उचलण्यात यावे अशी रास्त मागणी प्रवाशांकडुन होत आहे.

दि. ६ रोजी सकाळी घडलेला प्रकार खरोखर दयनीय होता परंतु प्रवासींनी मला व मी संबंधितांना कळवताच रेल्वे प्रशासनाने सहकार्य करत ट्रेन मागे घेत प्रवासीला ट्रेन मध्ये घेत प्रथमउपचार केलेत या प्रकाराने आम्ही सर्वजण भारावून गेलेलो आहोत. आमची किंमत प्रशासनाकडे आहे. याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. तात्काळ यावर उपाय करून प्रवासी वर्गाला दिलासा देण्यात यावा.

-दिलीप पाटील
पाचोरा संस्थापक अध्यक्ष – ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटना

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.