लासगावच्या कोविड लसीकरण केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांची भेट

0

लासगाव. ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लासगाव येथील कोविड लसीकरण केंद्राला जि.प. जळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी भेट दिली.

भेटीदरम्यान लसीकरणासंदर्भात संपूर्ण माहीती घेतली. त्याच दरम्यान बाला उपक्रमाअंतर्गत जि.प. मराठी शाळेमध्ये केलेल्या कामाच्या पाहणी केली व बाला उपक्रमातील निकषाप्रमाणे असलेले सर्व उपक्रम लवकर पुर्ण करुन घ्या अशी सुचना साहेबांनी दिली.

शाळेत केलेल्या कामांची साहेबांना भरपुर स्तुती केली. त्यावेळी डि. के. अप्पा पाटील, इम्रान शेख, राजेंद्र तायडे, संदिप पाटील, अनिल बडगुजर, गोपाल पाटील व शाळेतील शिक्षक वृंद आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.