लस टाळणं महागात पडणारː अदर पुनावाला

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोना महामारीने  गेल्या दोन वर्षापासून थैमान माजवलं आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुुरु आहेत. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी अद्याप कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली आहे.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. या लसीकरण मोहिमेत संपूर्ण जगाला लस पुरवणारे सीरम इंस्टिट्यूटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी लसीकरणाविषयी आता महत्त्वाची माहिती दिली आहे.

कोरोना काळात लस हे एकमेव शस्त्र आहे. लसीकरणामुळे कोरोना बऱ्याचं अंशी आटोक्यात आल्याचं चित्र आहे. त्यामुळे लसीकरण मोहिम राबवल्या जात आहे. देशातील पहिली कोरोना लस बनवल्यामुळे सीरम इंस्टिट्यूट आणि पुनावाला यांचं नाव चर्चेचा विषय ठरलं. आता त्यांनी नागरिकांना लस घेणं गरजेचं असल्यांचं सांंगितलं आहे.

जर कोणी लस घेण्याचं टाळत असेल, तर सध्या हा सर्वात मोठा धोका आहे, असं कोरोना प्रादुर्भावात प्रतिबंधक लस बनविणाऱ्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. लस उद्योगानं राष्ट्रासाठी पुरेसा लस साठा उपलब्ध करुन देण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. राज्यामध्ये 200 दशलक्षाहून अधिक डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे अदर पुनावाला यांना नागरिकांना लस घेण्यास आवाहन केलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.