लज्जास्पद कृत्य ; तरुणीच्या गुप्तांगातून घेतला कोरोना स्वॅब

0

अमरावती: एकीकडे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना. दुसरीकडे मात्र एक संतापजनक घटना समोर आली आहे. अमरावती येथील बडनेरा शहरात लॅब टेक्निशियनचे लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. या प्रयोगशाळेतील टेक्निशियनने कोरोना टेस्टसाठी 24 वर्षांच्या मुलीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतले. महिलेच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. अल्पेश अशोक देशमुख असे आरोपी लॅब टेक्निशियन असे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी एका मॉलमध्ये नोकरी करते. जिथे एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. सावधगिरीने 28 जुलै रोजी इतर सर्व कर्मचाऱ्यांची सरकारी लॅबमध्ये चाचणी घेण्यात आली. अल्पेश याने पीडित मुलीला पुन्हा लॅबमध्ये बोलावले. तुमचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे असं तिला सांगितलं. तसेच तुम्हाला युरिनल चाचणी करावी लागेल, असे खोटे बोलून त्या प्रयोगशाळेच्या टेक्निशियनने संधीचा फायदा उठविला आणि त्या मुलीबरोबर लाजिरवाणे कृत्य केले.

गुप्तांगातून स्वॅब घेतल्यामुळे पीडित युवतीला शंका आली. तिने आपल्या भावाला झालेला प्रकार सांगितला. त्यांनतर त्यांनी एका डॉक्टरांशी संपर्क केला तर अशा प्रकारे स्वॅब घेतले जात नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर या प्रकरणी सदर मुलीने लॅब टेक्निशियन विरोधात बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.