लंडन कोर्टाचा माल्ल्याला झटका : प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली

0

लंडन :- भारतीय बँकांना हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्या याला मोठा झटका बसला आहे. लंडनमधील न्यायालयात माल्ल्याने दाखल केलेली प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली आहे. ब्रिटनचे गृह सचिव साजिद जाविद यांनी मल्ल्याविरोधात प्रत्यार्पण आदेशावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे लवकरच माल्ल्याला भारतात आणता येणार आहे. माल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मिळालेली मंजुरी हे भारतीय तपासयंत्रणांना मिळालेले मोठे यश असून, आता माल्ल्याच्या मुसक्या आवळून त्याला काही दिवसांतच भारतात आणले जाण्याची शक्यता आहे.

भारतीय बँकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या परदेशात फरार झाला होता. त्यानंतर तो इंग्लंडमध्ये असल्याची माहिती समोर आल्यापासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान, मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातील याचिकेवर लंडनमधील न्यायालयात सुनावणी सुरू होती.

काही महिन्यांपूर्वी विजय मल्ल्याने बँकांकडे नवा प्रस्ताव पाठवला होता. त्यात त्याने मुद्दलाचे पूर्ण पैसे देतो, व्याज नाही असं आश्वासन दिलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.