अखेर आ.अनिल गोटेंचा आमदारकीचा राजीनामा

0

धुळे :- निवडणुकीच्या तोंडावर धुळे महानगरपालिकेपासून नाराज असलेल्या भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी अखेर भाजपच्या सदस्यत्व आणि आमदारकीचा आज सोमवारी राजीनामा दिला आहे. गोटे उद्या लोकसभेसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. गोटे यांनी याआधी अनेक वेळा त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. आज गोटे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला.

दरम्यान, आमदारकीचा राजीनामा देताना गोटे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर टीका केली. महापालिका निवडणुकीची सूत्रे भाजपने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविल्यापासून गोटे नाराज होते. तसेच धुळे पालिका निवडणुकीत सुभाष भामरे यांनी गोटे यांना बाजूला ठेवले होते. तेव्हापासून गोटे आणि भामरे यांच्यातील वाद टोकाला गेला. बंडखोरी करत असताना यापुढे आपले एकच लक्ष आहे ते म्हणजे सुभाष भामरे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आता लोकसभा निवडणुकी भाजपचे अधिकृत आमदार भामरे यांच्याविरुद्ध त्यांनी लढण्याचे ठरवले आहे. त्यामुळे धुळे मतदारसंघात भामरे-गोटे-काँग्रेसचे कुणाल पाटील पाटील अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.

गेल्याच महिन्यात गोटेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. गोटे 26 वर्षांचं वैर विसरुन पवारांच्या भेटीला गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हाच गोटेंनी भामरेंविरोधात शड्डू ठोकमार असल्याचं म्हटलं होतं. त्यासाठीच्या मोर्चेबांधणीसाठी गोटेंनी पवारांची भेट घेतली होती. ‘धुळ्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. गुन्हेगारी, टक्केवारी वाढली आहे. पक्षातील ही घाण साफ करायची आहे,’ असं गोटे म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.