रोटरी जळगाव स्टार्सने केली अवयवदानाविषयी जनजागृती

0

जळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सने क्लबचे पदाधिकारी व जय मातादी इस्टेटचे संचालक चंदन तोष्णीवाल यांच्या सहकार्याने श्री गणेश विसर्जन मिरवणूकीत स्वतंत्र स्टॉल उभारुन मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स पडद्यावर अवयव व नेत्रदानाविषयी सामाजिक संदेश व माहिती देत जनजागृती केली.
गणेश उत्सवाचा मुळ हेतू सामाजिक जनजागृती व प्रबोधन असल्यामुळे रोटरी स्टार्सने प्रथमच हा प्रयत्न करुन 50 हजार गणेशभक्तांपर्यंत हा संदेश पोहचविल्याचे अध्यक्ष सागर मुंदडा व चंदन तोष्णीवाल यांनी यावेळी सांगितले. काही नागरिकांनी याप्रसंगी अवयवदानाचे संकल्प पत्र भरुन दिले. सर्व गणेश मंडळ पदाधिकारी व शहरातील विविध क्षेत्रातील 80 मान्यवरांचा सहप्रांतपाल डॉ. तुषार फिरके, प्रा. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी मानद सचिव करण ललवानी, सचिन बलदवा, योगेश कलंत्री, अश्‍विन मंडोरा, धनराज कासट, डॉ. गोविंद तापडीया, जिनल जैन, चेतन सोनी, पुनित रावलानी, निलेश नाथानी, रोमेश जाजू, राहुल कुकरेजा, मोहीत रावलानी, गौरव राका, अतुल तोतला, मुकेश शेटीया, अमित भागवानी, निकुंज अग्रवाल, सौरभ मुंदडा, निलेश अग्रवाल, याजवीन पेसुना, योगेश साखला, विपूल पटेल, धर्मेश गादिया, निखिल जगवानी, पुनित भल्ला, मुकेश बजाज, हितेश सुराणा आदिंनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.