नगरपालिकेतर्फे प्लास्टिक विरोधात मोहिम सुरू

0

पाचोरा | प्रतिनिधी
येथील नगरपालिकेतर्फे आज पासुन शहरातील हातगाडीवाले, दुकानदार यांच्या दुकानावर आरोग्यविभागाच्या 10 टिमने धडक मोहिम सुरू केली आहे. 10 टिम मध्ये 10 कर्मचारी समाविष्ट आहेत. या धडक मोहिमेने शहरातील हातगाडीवाले दुकानदार यांना चांगलाच चपराक बसणार आहे. आज 5 गोण्या प्लास्टिक, कॅरिबॅग जप्त करुन नगरपालिकेत जमा करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, ललित सोनार, नगरसेवक दादाभाऊ चौधरी सह कर्मचारी उपस्थित होते. प्लास्टिक कॅरिबॅग जप्त करतेवेळी हातगाडीवाले व दुकानदार यांना दंडात्मक कारवाईची ताकीत देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.