जी. एच. रायसोनी महाविद्यालयात वृक्षारोपण

0

जळगाव  | प्रतिनिधी 

जी.एच.रायसोनी महाविद्यालयात, येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी महाविद्यालय परिसरात २०० झाडांची लागवड करण्यात आली.

या वेळी संचालक श्री. रायसोनी म्हणाले की, ‘प्रत्येकाने झाडे लावले पाहिजे आणि त्याचे संवर्धन केले पाहिजे. वृक्षलागवड आणि संवर्धन ही आजची गरज आहे.’ प्रत्येकाने एका झाडाचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या उपक्रमाचे नियोजन ध्रुव अग्रवाल, यश पाटील, सागर सावंत, मयुरी पवार, भाग्येश्वरी महाजन या विध्यार्थ्यानी केले. तसेच या वेळी जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथव, स्थापत्य अभियांत्रिकीचे विभागप्रमुख आर. के. तिवारी, प्रा. एस. एन. पवार, प्रा. आयशा सय्यद, प्रा. सौरभ नाईक, प्रा. पूजा शिंदे व आदी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.