रेल कामगार सेनेतर्फे भुसावळात छत्रपतीं शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळयाचे आयोजन

0

भुसावळ : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा भुसावळ रेल कामगार सेनेतर्फे दिनांक 26 मार्च मंगळवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोहळा साजरा करण्यात येत आहे.
स्थानिक रेल प्रबंधक कार्यालयाचे प्रांगणात सकाळी 11 वाजता आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भुसावळ रेल प्रबंधक आर के यादव असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वेचे सर्व वरिष्ठ विभागीय अधोकारी उपस्थित राहणार आहे कार्यक्रमास सर्व कामगार बंधु भगिनी, शिवप्रेमी कार्यकर्ते , व रेल कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन विभागीय मंडळ अध्यक्ष ललितकुमार मूथा आणी रेल कामगार सेनेचे विभागीय पदाधिकारी यांनी केले आहे .कार्यक्रम याशस्वितेकरिता सर्व शाखा पदाधिकारी व आयोजक विशेष परिश्रम घेत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.