जागेबाबत सस्पेन्स कायम, निर्णयाचा चेंडू वरिष्ठांच्या दालनात

0

जळगाव – जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीतर्फे माजी आ. देवकर यांना जरी राष्ट्रवादीने उमेदवार घोषीत केले असले तरी रावेरच्या जागेबाबत सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे.
शहरातील केमीस्ट भवनात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा मेळावा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात उपस्थिती देवून आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका यावेळी त्यांच्या सोबत जितेंद्र आढाव, अ‍ॅड. रविंद्रभैय्या पाटील, विलास पाटील, गुलाबराव देवकर आदी उपस्थित होते.
रावेरच्या जागेबाबत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र रावेरची जागा ही राष्ट्रवादीला की काँग्रेसला तसेच उमेदवाराबाबतही वेळ भरपूर असल्याने लवकरच पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीकडून नवीन चेहर्‍यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाने कोल्हापूर येथील सभेसाठी कर्नाटकातून अमराठी लोकांची गर्दी आणली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. गिरीश महाजन दिसल्यावर उद्धव ठाकरेही घाबरत असतील चोरी करण्यात महाजनांचा हातखंडा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
ज्यांची ताकद नाही तेच आम्हाला सोडून गेल्याचे गयारामांबाबत बोलताना ते म्हणाले तर भाजपला आजही उमेदवारांची आयात लागते त्यामुळे त्यांची ताकद किती? असा सवाल त्यांनी विचारला. मोदींच्या कारकीर्दीत भारतावर 82 लाख कोटींचे कर्ज झाल्याची त्यांनी माहिती दिली. भाजपा सत्तेत आली तेव्हा 51 लाख कोटीचे कर्ज होते. येत्या पाच वर्षात त्यात वाढ होवून 31 लाख कोटी कर्जाची त्यात भर पडली आहे. भाजप व शिवसेना दोघांनी एकमेकांविरुद्ध शेलक्या टीका केलेली आहे. निवडणुका आल्यावर मात्र युती जाहीर करुन टाकली असल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.