रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी डॉक्टरांची भूमिका महत्वाची ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

0

पारोळा तहसिल कार्यालयात एरंडोल व पारोळा तालुका कोरोना बाबत आढावा

पारोळा । प्रतिनिधी
लोकप्रतिनिधींची समन्वयाची भूमिका, तालुका प्रशासनाच्या चांगल्या उपाययोजना व त्यास नागरीकांची भक्कम साथ यामुळे पारोळा,एरंडोल तालुका व जिल्हा निश्चितपणे ग्रीन झोनमध्ये येण्यास मदत होईल. असा आशावाद आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. पारोळा येथील तहसील कार्यालयात पारोळा व एरंडोल येथील कोरोना कोव्हीड १९चा विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना आढावा बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते.
यावेळी एरंडोल विभागाचे प्रांताधिकारी विनय गोसावी,पारोळा तहसीलदार अनिल गवांदे,अर्चना गोरे,सहाय्यक पोलीस अधीक्षक राजेंद्र ससाणे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ फिरोज खान,डॉ प्रांजली पाटील यांच्यासह पारोळा शहराचे नगराध्यक्ष करण पवार,एरंडोल नगराध्यक्ष रमेश परदेशी, पारोळा तालुका प्रमुख आर बी पाटील,वासुदेव पाटील,जिल्हा परिषद सदस्य डॉ हर्षल माने,अशोक मराठे,आबा महाजन, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, अकलाडे , पी आय उनवणे व जाधव ,न पा मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री यांनी पारोळा तालुक्याचा कोरोना संदर्भात आढावा घेत म्हणाले कि,कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असुन रुग्णांचे मनोधैर्य वाढविणे गरजेचे आहे.कोरोनाच्या भितीने बरेच रुग्णांचे मनोधैर्य खचत असल्याने त्यांना बरे होण्यास उशीर लागत आहे.त्यामुळे कोरोना हा आजार बरा होणारा असुन याबाबत काळजी घेणे महत्वाचे आहे.नागरिकांनी भितीपोटी या आजाराबाबत मानसिकता वाढविली असुन प्रशासनाने याबाबत उपाययोजना करुन प्रशासनाचे नियमांचे पालन केले तर निश्चितच हा आजार बरा होणारा आहे.त्यामुळे भयभीत न होता कसोटीने या आजाराचा मुकाबला करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्र्यांनी आवाहन केले आहे.तसेच डाँक्टरांनी रुग्णांच्या मनोधैर्य वाढवत त्यांच्या सर्वागीण देखभाल करण्याच्या सुचना केल्या, आपला जिल्हा हा लवकरच कसा ग्रीन झोन मध्ये येईल या बाबत सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले.कोरोना बाधीत रुग्ण उपचारापासुन वंचित राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अश्या सुचना देखील त्यांनी यावेळी केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.