रिलायन्स कंपनीचा मोबाईल टॉवर बंद करण्याची मागणी

0

जामनेर (प्रतिनिधी):- येथील मदनी नगर भागातील रिलायन्स कंपनीच्या मोबाईल टॉवरमुळे परीसरातील रहिवाश्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने सदर टाॅवर त्वरीत बंद करावे अशी मागणी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शहरातील मदनी नगर भागातील गट नंबर ९८०/२ प्लाॅट नंबर ११ मध्ये रिलायन्स कंपनीचा ५० फुटाचा मोबाईल टॉवर उभारण्यात आलेले असून सदर टॉवरमुळे हवाई प्रदुषण होत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील लहान मुलांसह नागरिकांना अनेक आजार उध्दबवत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.जिवीतहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या टॉवरजवळ सैय्यद करीम हॉल असून त्यामध्ये लग्न समारंभाचे अनेक कार्यक्रम होत असतात. याच परीसरात अॅग्लो उर्दू हायस्कूल असल्याने याठिकाणी विद्यार्थ्यांसह नागरीकांची मोठी वर्दळ असते.तरी नगरपालिका प्रशासनाने सदर टॉवर त्वरीत बंद न केल्यास आंदोलनासह उपोषणाचा इशारा ही निवेदनातुन देण्यात आलेला आहे. यानिवेदनावर अॅड.शेख रफीक,शेख इरफान,एल.एच. खान,शेख जावेद आदिसह सुमारे २०-२५ रहिवाश्यांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.