इ कॉमर्स पॉलिसी विरुद्ध चोपडा मोबाईल रिटेलर बांधवांचा बंद

0

चोपडा – सरकारचे व ऑनलाइन व्यापाराचे चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ दि ८ रोजी चोपडा तालुका रिटेलर मोबाईल असोसिएशन तर्फे तालुक्यातील सर्व मोबाईल दुकाने बंद ठेवत AIMRD च्या बंदला पाठींबा देऊन विविध मागण्यांचे निवेदन चोपडा तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले.

चुकीच्या धोरणातून ऑन लाईन च्या माध्यमातून दिल्या जाणारा डिस्काउंट बंद करावा,इ कॉमर्स कंपनीला नियंत्रित करण्यासाठी एक नियमित शासक बनवून एफडीआय कायद्याचा उल्लंघन न करता सर्वांना समान व्यापाराची सवलत मिळेल असा कायदा बनवावा,ऑनलाइन कंपनींना दिला जाणारे लेटेस्ट प्रॉडक्ट देणे बंद करून सर्वांसाठी सारखे उत्पादन,एक सारखी किंमत,समान सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. ऑनलाइन ऑफर्सची किंमतीत फरक नसावा.अश्या विविध मागण्यांचे निवेदन चोपडा तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले.यावेळी अनिल वानखेडे,महेश पवार, आबा देशमुख,रमेश अग्रवाल,महेश सिंधी,जय सिंधी,भरत देशमुख यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.