रियलमीच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत

0

नवी दिल्ली : जर तुम्हाला कमी किंमतीत मिड रेंज स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तसचे जास्त स्टोरेजचा फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही या रियलमीचा फोन खरेदी करू शकता.  चीनची कंपनी रियलमीने भारतात मार्चमध्ये लाँच केलेला ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा स्मार्टफोनच्या किंमतीत जबरदस्त कपात केली आहे.  कंपनीने रियलमी फेस्टिव डेज अंतर्गत आता हँडसेटच्या किंमतीत २ हजार रुपयांची कपात केली आहे. ही कपात केवळ ६ जीबी रॅम सोबत येणाऱ्या ६४ जीबी व ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये करण्यात आली आहे. फोनला या वर्षी मार्च मध्ये रियलमी ६ आय सोबत लाँच केले होते.

Realme 6 ची किंमत

रियलमी ६ ची किंमत गेल्यावेळी सप्टेंबर महिन्यात १ हजार रुपयांची कपात करण्यात आली होती. यानंतर ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १४ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम स्टोरेजची किंमत १६ हजार ९९९ रुपये झाली होती.

परंतु, आता फोनच्या किंमतीत २ हजार रुपयांची कपात करण्यात आल्यानंतर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत १२ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये झाली आहे. कंपनीच्या साइट व फ्लिपकार्टवरुन नवीन किंमतीत फोन खरेदी करता येवू शकतो. फोन कॉमेट व्हाइट आणि कॉमेट ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे.

रियलमीच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा अल्ट्रा स्मूथ फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G90T प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. हँडसेट अँड्रॉयड १० बेस्ड रियलमी यूआय वर काम करतो. रियलमीच्या या फोनमध्ये ६४ एआय क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. तर १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. रियलमीच्या फोनला पॉवर देण्यासाठी यात 4300mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी ३० वॉट फ्लॅश चार्ज टेक्नोलॉजीला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, फोन ५५ मिनिटात १०० टक्के चार्ज होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.