राष्ट्रीय ओ.बी.सी.महासंघ बुलडाणा जिल्हा बैठक माळी भवन खामगांव येथे संपन्न

0

खामगांव (प्रतिनीधी) –स्थानिक माळी भवन खामगांव येथे दि.06/12/2020 रविवारला राष्ट्रीय ओ.बी.सी.महासंघ बुलडाणा ची जिल्हा बैठक ओ.बी.सी.नेते तसेच माळी सेवा मंडळ अध्यक्ष मा.श्री.प्रल्हादभाऊ बगाडे त्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.अनिल अमलकार, जिल्हा कार्याध्यक्ष अॅड.प्रमोद डाबरे,जिल्हा सचिव अरविंद शिंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .

सर्वप्रथम महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य अभिवादन करण्यात आले.त्यानंतर बुलडाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ओ.बी.सी.नेते मा. डॉ.संजयजी कुटे यांचे वडील स्व.श्रीरामजी कुटे (गुरुजी) यांना ओ.बी.सी.महासंघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच ओ.बी.सी.महासंघाचे सक्रिय कार्यकर्ते श्री.प्रदीप सातव सर यांचे  वडील स्व.भगवान सातव स्व.भगवान सातव (गुरुजी) यांना ओ.बी.सी.महासंघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

बैठकीमध्ये ओ.बी.सी.समाजातील विविध सामाजिक संघटनांसोबत चर्चा करून राष्ट्रीय ओ.बी.सी.महासंघ कार्यपध्द्ती व पुढील नियोजन करण्यासंदर्भात जास्तीत जास्त ओ.बी.सी.समाजातील तरुणांना ओ.बी.सी.महासंघात सहभागी करून घेण्यासाठी  भेटी घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.राष्ट्रीय ओ.बी.सी.महासंघाची उर्वरित कार्यकारिणी निश्चित करण्यासाठी बुलडाणा जिल्हा व प्रत्येक तालुक्यात दौरे निश्चित करणे     या विषयावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले . तसेच सौ.माधुरीताई राणे यांची राष्ट्रीय ओ.बी.सी.महासंघ बुलडाणा महिला कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ.रत्नाताई डिक्कर यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन श्री.अरविंद शिंगाडे यांनी केले . कार्याध्यक्ष अॅड प्रमोदजी डाबरे व जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.अनिल अमलकार ,सौ रत्नाताई डिक्कर,अजयभाऊ तायडे, मनोज भोपळे, तुळशीदास तोंडे सर  यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ओ.बी.सी.नेते व माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष मा.श्री.प्रल्हादभाऊ बगाडे यांनी मार्गदर्शन व आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाला ओ.बी.सी.नेते प्रल्हादभाऊ बगाडे,जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.अनिलजी अमलकार,कार्याध्यक्ष अॅड.प्रमोद डाबरे,जिल्हा सचिव श्री.अरविंद शिंगाडे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख धनंजय महाले,श्री.अजय तायडे,अनिल मुलांडे,जयेश वावगे,मनोज सुळोकार,सुरज बेलोकार,कैलाश भारसाकळे,प्रफुल हाडके,तुळशीदास तोंडे,ज्ञानेश्वर वरनकार,दत्तात्रय जवळकार,मनोज भोपळे,प्रमोद सोनोने,रामेश्वर जोहरी,जगन्नाथ बोंबटकार,सुरेश बगाडे,बाळ सोनाळकर,अरविंद बोचरे,नरेंद्र वानखडे,संतोष निलखन,संजय राणे, चंदन कौशल्य,सौ.रत्नाताई डिक्कर,सौ.सुनीता राजोडे,सौ.सुवर्णा वदोडे,सौ.माधुरीताई राणे,सौ.भक्ती वाणी व बहुसंख्येने ओ.बी.सी.बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.