राष्ट्रवादीच्या पहिली यादीत जळगाव जिल्ह्यात सात जणांचा समावेश

0

मुंबई : काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांची ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. दरम्यान या पहिल्या यादीत जळगाव जिल्ह्यात सात उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. त्यात जळगाव ग्रामीण मतदारसंघातून पुष्पा ज्ञानेश्वर महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर जगदिश वळवी – चोपडा (जळगाव), अनिल भाईदास पाटील – अमळनेर, डॉ. सतीश पाटील – एरंडोल, राजीव देशमुख – चाळीसगाव, दिलीप वाघ – पाचोरा, संजय गरुड – जामनेर यांचा समावेश आहे.

रात्री उशिरा राष्ट्रवादीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राष्ट्रवादीने येवल्यातून छगन भुजबळ, घनसावंगीतून राजेश टोपे, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, मुंब्रा-कळवामधून जितेंद्र आव्हाड, विक्रोळीतून माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, दिंडोशीतून विद्या चव्हाण, अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक, बारामतीतून अजित पवार, आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील, श्रीवर्धन येथून अदिती तटकरे, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, परळीतून धनंजय मुंडे, इस्लामपूरमधून जयंत पाटील आणि तासगाव कवठे महांकाळमधून सुमन आर. पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.