दिव्याग युवतीवर अत्याचार करून फरार झालेला आरोपी जेरबंद

0

बाजारपेठ पोलिसांची कामगीरी

भुसावळ (प्रतिनिधी)- चाकूचा धाकावर दिव्याग युवतीवर अत्याचार करून फरार झालेल्या  आरोपीला सुरत (गुजरात)मधून बाजारपेठ पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.

भुसावळ मध्ये नवीन ईदगाह जवळ १७ वर्षीय दिव्याग अल्पवयीन युवती वर आरोपी अमीन शेख याने  चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केले होते.याबाबत  बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये  भाग ५ गुरन ०४९३/२०१९ भा द वि कलम-३७६(१) ३७६ -२(१) तसेच लैंगिक अपराधा पासून संरक्षण अधि.कलम-४,६,१२प्रमाणे १ ऑक्टोबर  मंगळवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता .

गुन्हातील फरार आरोपी  शेख अमीन शेख अकिल शेख वय-२७ रा. मुस्लिम कॉलनी आरोपी सुरत मध्ये असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस अधीक्षक  डॉ. पंजाबराव उगले याच्या परवानगीने तपास पथक तयार करून सुरत येथे रवाना करण्यात आले होते .फरार आरोपी याला सुरत क्राइम ब्रांचच्या कर्मचारी यांच्या मदतीने सुरत शहरातून मिठी खाडी भागातून सापळा रचून ताब्यात घेतले आहे.

यांनी केली कार्यवाही        

ही  कार्यवाही पोलीस अधीक्षक  डॉ पंजाबराव उगले ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके जळगाव तसेच .उपविभागीय पोलीस अधिकारी  गजाजन राठोड व .पोलीस निरीक्षक  दिलीप भागवत सो यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. रमण सुरळकर, पो.काॅ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव यांनीकेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.