राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर सरकारविरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी !

0

मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: आज दुपारी ईडी कार्यालयात जाणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्ते हजर झाले आहेत. कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर  सरकारविरोधा घोषणाबाजीही केली.

संविधानिक संस्थांचा राजकीय हत्यार म्हणून सत्ताधाऱ्यांकडून वापर होत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

दरम्यान,शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याअगोदर मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी कलम 144 लागू करत मुंबईत जमावबंदी लावली आहे. पवार यांनी स्वत: ईडीसमोर हजर होण्याचा पवित्रा घेतल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. पवार ईडी कार्यालयात जाणार त्यादरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांकडून परिसरात गर्दी केली जाऊ शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.