राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर !

0

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.  काल राष्ट्रवादीने 77 जणांची पहिली यादी केली होती.

आज जाहीर केलेल्या यादीत अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील आरोपी रमेश कदम यांचं नाव नाही. मात्र भाजपच्या वाटेवरील आमदार बबन शिंदे, शिवसेनेशी संपर्कात असलेले तटकरेंचे जवळचे आमदार सुरेश लाड यांना राष्ट्रवादीने तिकीटं दिली आहेत. कोल्हापूरमधील चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याऐवजी गोकूळचे संचालक राजेश नरसिंग पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नाशिकमधून भाजपला बंडखोरीचा पहिला फटका बसला आहे.  भाजपच्या सरोज अहिरे राष्ट्रवादीकडून लढणार आहेत.  सरोज अहिरे यांना राष्ट्रवादीकडून देवळाली मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली आहे. सरोज अहिरे या मनपाच्या महिला बालविकास समितीच्या सभापती आणि विद्यमान नगरसेविका आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस दुसरी उमेदवार यादी

१ जळगाव शहर – अभिषेक पाटील

२ बाळापूर – संग्राम गावडे

३ कारंजा – प्रकाश डहाके

४ मेळघाट – केवळराम काळे

५ अहेरी – धर्मरावबाबा आत्राम

६ दिग्रस – मो. तारीक मो. शमी

७ गंगाखेड – डॉ. मधूसुदन केंद्रे

८ कन्नड – संतोष कोल्हे

९ नांदगाव – पंकज भुजबळ

१० बागलान – दीपिका चव्हाण

११ देवळाली – सरोज अहिरे

१२ कर्जत – सुरेश लाड

१३ खेड आळंदी – दिलीप मोहिते

१४ मावळ – सुनिल शेळके

१५ पिंपरी – सुलक्षणा शिलावंत

१६ आष्टी – बाळासाहेब आजबे

१७ माढा – बबनदादा शिंदे

१८ मोहोळ – यशवंत माने

१९ माळशिरस – उत्तमराव जानकर

२० चंदगड – राजेश नरसिंग पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.