रावेर मतदार संघातील उमेदवारांचे नशीब आज होणार ईव्हीएम मध्ये बंद

0

भुसावळ :-लोकसभा निवडणुकीच्या रावेर मतदार संघासाठी आज २३ रोजी मतदान होत असून भाजप, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी या तीन प्रमुख पक्षांमध्ये लढत होत आहे. आज होणा-या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदान प्रक्रियेसाठी लागणाNया साहित्याचे वाटप आज २२ रोजी प्रांताधिकारी कार्यालयाच्या नविन प्रशासकीय इमारतीत करण्यात आले.

महसुल यंत्रणेचे अधिकारी व कर्मचा-यांनी सहायक निवडणुक अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्याचे वितरण झाले. प्रसंगी तहसीलदार महेंद्र पवार, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, निवडणुक नायब तहसीलदार विजय भालेराव, योगेश मुस्कावाड आदी उपस्थित होेते.
आज होणा-या निवडणुकीसाठी शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीत महसुल यंत्रणेने मतदानासाठी लागणारे साहित्याचे सकाळी ८ वाजेपासून वितरण सुरु केले.यावेळी मतदान वेंâद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या वेंâद्र प्रमुख यांच्याकडे ईव्हीएम बॅलेटसह सर्व साहित्य देण्यात आले. दुपारी २ वाजेपर्यंत तालुक्यातील सर्व वेंâद्र प्रमुख व नियुक्त कर्मचारी साहित्य घेवून एसटी प्रशासनाच्या बसेस मधून रवाना झाले. यामध्ये एसटी महामंडळाच्या ताफ्यातील २९ बसेस व खाजगी ९८ चारचाकी वाहनांचा समावेश होता.३१५ मतदान वेंâद्रांवर हे साहित्य चोख बंदोबस्तात रवाना करण्यात आले.या दरम्यान प्रांताधिकारी कार्यालयाच्या नविन प्रशासकीय इमारतीच्या आवारात कर्मचा-यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.तसेच कर्मचा-यांसाठी आवारात मंडप टावूâन विभागानिहाय नियोजन करण्यात आले होते.इतकेच नव्हेतर मतदान वेंâद्रावर रवाना होणा-या कर्मचा-यांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
·

मतदान वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार
मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे. मतदान वेंâद्रात ६ वाजेपर्यंत रांगेत असणा-या प्रत्येक मतदारांना मतदान वेंâद्रातील अधिकारी एक कुपन देतील ज्यांच्याजवळ वूâपन असेल त्यांची मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रीया सुरु राहील.

 भुसावळ विधानसभा क्षेत्रात ११ वेंâद्रे संवेदनशील
भुसावळ विधानसभा क्षेत्रात ११ मतदान वेंâद्रे संवेदनशील असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड यांनी दिली. या विधानसभा क्षेत्रात एकुण ३१५ मतदान वेंâद्रे असून २ हजार ५५४ कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३ लाख ३ हजार ३०३ मतदार हक्क बजावणार असून यासाठी ५२५ पोलीस कर्मचारी तालुक्यातील व २५० कर्मचारी बाहेरील बोलाविण्यात आले आहेत. या एक पोलीस उपविभागीय अधिकारी तीन पोलीस निरीक्षक व चार प्रभारी अधिकारी अशा आठ अधिका-यांचा समावेश आहे.

असे आहेत मतदान वेंâद्रावरील कर्मचारी
तालुक्यात ३१५ मतदान वेंâद्रावर प्रत्येकी सात कर्मचारी असणार आहेत.यामध्ये अंगणवाडी सेविका,शिपाई,बीएलओ व पोलीस कर्मचारी यांचा समावेश असणार आहे.मतदान वेंâद्रावर कुठल्याही प्रकार अनुचित प्रकार होवू नये.यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.तसेच सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी कर्मचा-यांना योग्य ते प्रशिक्षण व आवश्यक सुचना दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.