रायसोनी अभियांत्रिकी फुटबॉल स्पर्धेत उपविजेत

0

जळगाव, दि.१३ – येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे सिद्धार्थ शिकारी, आदित्य भंगाळे, नरेंद्र चौधरी या विद्यार्थ्यांची विभागीय संघात निवड करण्यात आली आहे. तसेच वैभव डिमरी, पियुष पाटील, अमन चव्हाण, दुर्गेश पाटील, साहिल नारखेडे, शुभम भामरे, विपुल चौधरी, शुभम पाटील, अतुल बडगुजर, अक्षय जडेजा, रोहित ठाकरे, अतुल चौधरी, विपिन जोशी व राहुल दाडी या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. यावेळी एकूण ११ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. महाविद्यालयात हे विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेत आहेत. पुढील सामना आज पंकज महाविद्यालय चोपडा येथे होणार आहे.  

  नुकत्याच झालेल्या आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे पार पडल्या. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.संजय जाधव यांचे मागदर्शन लाभले. स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचे कार्यकारी संचालक प्रितमजी रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, उपप्राचार्य डॉ.किशोर भदाणे, विभागप्रमुख प्रा.राकेश तिवारी प्रा.राजेश दहिभाते यांनी अभिनंदन केले. 

Leave A Reply

Your email address will not be published.