राधाकृष्ण प्रभातफेरी तर्फे वृक्षारोपण संपन्न ; 50 वृक्षांचे रोपण व संगोपनाची घेतली जबाबदारी

0

भुसावळ | प्रतिनिधी 

प्रतिवर्षानुसार यंदाही शहरातील राधाकृष्ण प्रभातफेरी मंडळातर्फे वृक्षारोपण करण्यात आले . स्थानिक गायत्री शक्ती पिठ मंदिर परिसरात दिनांक 29 जून रोजी सकाळी करण्यात आले . शहरातील विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व सभासद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे . प्रसंगी या  50 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला केवळ झाडे लावून कर्तव्य विसरणे योग्य नाही या झाडांना जगविले पाहिजे, म्हणून राधाकृष्ण प्रभातफेरी मंडळातर्फे शहरात विविध भागात वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात येणार आहे . पाणी अडवा, पाणी जिरवा , वृक्ष लागवड करा व संवर्धन करा असा सल्ला अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांनी यावेळी दिला . प्रसंगी सर्व उपस्थितांनी वृक्षारोपण व सवर्धनाचा संकल्प घेतला . त्यानुसार रेल्वे विभागीय प्रबंधक आर के यादव , प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा सौ रजनी सावकारे , नगरसेवक .प्रा  दिनेश राठी , निर्मल कोठारी, ऍड बोधराज चौधरी, डॉ वसंत चौधरी, आदी मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी ब्रिजमोहन अग्रवाल, सी ए . एम बी अग्रवाल , संजय अग्रवाल, डॉ देवेंद्र शर्मा , सामाजिक कार्यकर्ते जे बी कोटेचा , डॉ संदिप जैन, अर्जुन पटेल , लालजी पटेल , जयंतीलाल सुराणा , संजय फालक , नरेंद्र अग्रवाल , ऍड सतिश सराफ, राजेश लढ्ढा , प्रवीण   भराडे, लीलाधर अग्रवाल , नगीन कोटेचा , योगेश मंडलेचा , सुनील कोटेचा, पं जे आर शर्मा , गोविंद हेडा, जी आर ठाकूर , राजेश भराडीया, संजय लाहोटी , मूलचंद लाहोटी, संदीप देवडा , मदनलाल जागींड , सुरेश काबरा, राजेश चांडक , सुरेश शर्मा , संतोष नागला , गोपाल तिवारी , माहेश्वरी महिला मंडळ अध्यक्षा सौ मनीषा काबरा , प्रा सौ शुभांगी राठी, अयोध्या मंत्री सौ शितल भराडे , शामा लढ्ढा, निशा शर्मा , सौ वीणा लाहोटी, श्रुती लाहोटी, मीना अग्रवाल , शशी लाहोटी ,राज  भराडे, यांचेसह महिला व नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.