स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षानंतर चिंचखेड्यात धावली लालपरी

0

आमदार किशोर पाटलांच्या प्रयत्नांना यश

पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील चिंचखेडा (गलवाडे) येथे स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७० वर्षानंतर प्रथमच एस. टी. महामंडळाची बस धावली असून पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाल्याची भावना गावकाऱ्यासह प्रवाश्यांनी व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्ह्याच्या व  पाचोरा तालुक्याच्या सिमेवर वसलेले चिंचखेडा बु” हे गाव  स्वातंत्र्यकाळापासून विकासा पासून वंचित असल्याची गावकऱ्यांची भावना होती. या ठिकाणी दळणवळणाची चांगली सुविधा नव्हती, पिण्याच्या पाण्याची टंचाई, शिक्षण आरोग्य सेवा यासह शासनाच्या विविध प्रकारच्या योजना येथे पोहचत  नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या त्यातच पाचोऱ्याहून अवघे ११ किलोमीटर लांब असलेल्या या गावातील नागरिकांना विद्र्थांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने बसची सुविधा देखील मिळाली नव्हती त्यामुळे याची दाखल दखल घेतआमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या गावासाठी तारखेडा ते चिंचखेडा हा ३ कोटी २१ लाख रुपयांचा ५  किलोमीटर अंतर असलेला  डांबरी रस्ता मंजूर करत त्याचे प्रत्यक्ष लोकार्पण केल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा पक्का रस्ता झाल्याने चिंचखेडा ग्रामस्थांचे पाचोरा येण्यासाठी मराठवाड्यातून येवून साधारण २० रुपये खर्च करून यावे लागत होते. पाचोरा तारखेडा चिंचखेडा अशी एस.टी.बस.सुरू झाल्याने आता तेथील नागरीकांना फक्त १० रुपये भाडे देउन पाचोरा प्रवास सुखकर  होऊन सुमारे १० किलोमीटरचा फेरा वाचला आहे. आज प्रथमच लालपरी गावात आल्याने चिंचखेडा ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला तर आमदार किशोर पाटील याचे आभार मानले. यावेळी आगार व्यवस्थापक  वाणी. एस. टी. महामंडळाचे बेहरे बस चे चालक- वाहक याचा सत्कार करण्यात आला.यावेळी पाचोरा भडगाव शिवसेना संर्पक प्रमुख सुनील पाटील. अॅड. दिनकर देवरे, जि. प. सदस्य पदमसिंग पाटील उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, स्वीय सहायक राजेश पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, वाघ गुरुजी, अजय पाटील, भरत खंडेलवाल, आर.आर.पाटील, तारखेडा सरपंच अरुण पाटील, पोपट पाटील, अर्जुन पाटील, शांताराम पाटील, फुलचंद पाटील, गोकुळ पाटील, नाना पाटील, सागर पाटील यांच्या सह शालेय विद्यार्थी पालक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.