अखेर १७ तासांनंतर सापडला गजानन वाघ यांचा मृतदेह

0

ना. गिरीश महाजन यांनी जाहिर केली तातडीची मदत

पाचोरा | प्रतिनिधी 

कळमसरा ता. पाचोरा येथील पुरात बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह दि. २९ रोजी सकाळी शहापुरा शिवारातील बांध मधील ३ नंबरच्या फरशीजवळ शोधमोहीमेत आढळून आला. त्याला गावकऱ्यांनी बाहेर काढून रुग्णवाहिकेतून पाचोरा येथे ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेनासाठी पाठविण्यात आले. दरम्यान पालकमंत्री तथा जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.गिरीष महाजन यांनी मयत गजानन एकनाथ वाघ यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. व त्यांचे सांत्वन केले. तसेच शासनामार्फत मयताच्या वारसांना ४ लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. तसेच एकुलती शिवारातील बैलगाडीसह शेतकरी वाहून गेलेल्या फरशीवर तात्काळ पूल बांधण्याचे आदेश दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, जे.के.चव्हाण, दिपकसिंग राजपूत, कैलास चौधरी, डॉ.केयुर चौधरी, शरद सोनार, ईश्वर पाटील, समाधान पाटील, तलाठी शेख, तलाठी प्रवीण पवार सोबत होते.
प्रशासनाचे प्रामाणिक प्रयत्न
    पुरात शेतकरी गजानन वाघ बेपत्ता झाल्याचे समजताच उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसीलदार कैलास चावडे  घटनास्थळी लगेचच पोहोचले. तर प्रांत राजेंद्र कचरे यांनी स्वतः रात्री ११ वाजेपर्यंत पाण्यात उतरून शोधमोहीम केली. तर आज सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी कळमसरा गावी व घटनास्थळी हजेरी लावली. व बेपत्ता शेतकऱ्याला शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले. अखेर सकाळी ९ वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आल्याने  मृतदेह शवविच्छेदनसाठी व कुटूंबियांना सांत्वन केले. पोलीस प्रशासनाने खूप मेहनत घेतली. मयत गजानन वाघ यांच्यावर अत्यंत शोकाकुल  वातावरणात दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत गजानन वाघ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा,आई वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. गजानन हा अत्यंत मनमिळाऊ व प्रामाणिक होता. संपूर्ण गावात शोकाकुल वातावरण होते.

Leave A Reply

Your email address will not be published.