राज्यात सलग तीन दिवस पूर्वमोसमी पावसाची शक्यता

0

पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘यास’ चक्रीवादळ आणि अरबी समुद्र तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील चक्रिय चक्रावात यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनुसार, २५ ते २८ मे या काळात राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या काळात नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

दरम्यान विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पारा चाळिशीपार राहिला. सोमवारी चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४२.६ अंश सेल्सियस तापमान नोंदण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.