राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 124 वर पोहोचली

0

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 124 वर पोहोचली आहे. मुंबई-ठाण्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाला ‘कोरोना’ची लागण झाली आहे. काल दिवसभरात 15 नवे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 122 वर गेली होती. सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं काल समोर आलं होतं. या कुटुंबातील चौघांना आधीच कोरोना झाला होता. त्यानंतर कुटुंबातील आणखी पाच सदस्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले. मुंबईत आणखी 9 जणांना, तर ठाण्याच्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
पुण्याच्या नायडू रुग्णालयातून काल पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त ठरलेल्या पुण्याच्या दाम्पत्याला सकाळी डिस्चार्ज मिळाला होता. पिंपरी-चिंचवडमधल्या पहिल्या तीन ‘कोरोना’ग्रस्तांनाही घरी सोडण्यात येणार आहे. पुण्याच्या दाम्पत्यासोबतच दुबईचा प्रवास करुन आलेल्या पिंपरी-चिंचवडमधील तिघा ‘कोरोना पॉझिटिव्ह’ रुग्णांचा अहवाल आता निगेटिव्ह आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.