राज्यातील वेगवेगळ्या कारागृहातील १७ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडणार! राज्य सरकारचा निर्णय

0

मुंबई : राज्य सरकार राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात असणाऱ्या तब्बल 17000 कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगामध्ये एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने कैद्यांची संख्या कमी करणं आवश्यक आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्पुरती सुटका करण्यात येणाऱ्या कैद्यांमध्ये संघटित गुन्हेगारीची मोक्कासारखी कलमं असलेल्यांचा समावेश करता येणार नाही. UDPA, MCOCA, PMLA आणि इतर गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत असणाऱ्या कैद्यांना सोडण्यात येणार नाही.

मुंबईतल्या सर्वात मोठ्या आर्थर रोड कारागृहात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासन हादरलं होतं. त्यानंतर भायखळ्याच्या तुरुंगातही एक महिला कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळली.

Leave A Reply

Your email address will not be published.