राज्यपालांची भेट घेऊन सदाभाऊंनी आमदारकीसाठी दिली ‘ही’ १२ नावं ; जाणून घ्या

0

मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून ६ नोव्हेंबरला विधान परिषदेसाठीच्या १२ नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता.  त्यासाठी घालून देण्यात आलेली पंधरा दिवसांची मुदत संपली तरीही राजभवनाकडून अद्याप कोणाताही निर्णय झालेला नाही. अशातच माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी राज्यपालांकडे बारा जणांची यादी पाठविली आहे. ज्यांना कधीही संधी मिळालेली नाही, अशा लोकांची यादी पाठवत असून त्यांच्या नावांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती खोत यांनी राज्यपालांना केली आहे.

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. पण बऱ्याच वेळेस राजकीय पुनर्वसनासाठी या नियुक्त्यांचा वापर केला जातो.

यांचा नावांचा समावेश 

मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांच्या नावांची शिफारस सदाभाऊंनी राज्यपाल नियुक्त कोट्यातील आमदारकीसाठी केली आहे. या सर्व व्यक्ती त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय निर्णय घेणार यावर महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.