इलेक्ट्रीक शॉटसर्कीमुळे ऊस जळून दोन लाखाचे नुकसान

0

वरणगाव  : भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील इलेक्ट्रीक शॉटसर्कीटने आग लागल्याने दोन शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाला आग लागुन जळाल्याने सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले.

येथुन जवळच असलेल्या फुलगाव येथील शेतकरी अनिल शालीग्राम चौधरी व मक्तेदार शेतकरी नरेंद्र यंशवंत चौधरी यांचे  वरणगाव शिवारातील गट नं  १३५ , १३६ मधील दोन्ही शेतकऱ्याच्या प्रत्येकी एक , एक एकरामध्ये ऊसाची लागवड केली होती त्यात दि २५ रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतात असलेल्या इलेक्ट्रीक खाबाच्या ताराचे एकमेकाना घर्षन झाल्याने आगीचे गोळे ऊसाच्या शेतात पडल्याने शेतातील ऊस जळाला यात सुमारे शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान झाले.

या बाबत संत मुक्ताई साखर कारखान्याचे अधिकारी व विज वितरण कंपणीच्या अधिकाऱ्यानी पाहणी करुण  वरणगाव सजाचे तलाठी वंदना गोरे यांनी घटनेचा पंचनामा केला असुन शेतकरी अनिल चौधरी याच्या खबरी वरुण वरणगाव पोलीसात घटने बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.