राजवड येथील गजानन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना इंग्रजी सराव पुस्तकांचे वाटप

0

अमळनेर (प्रतिनिधी):-शैक्षणिक वर्ष 2020-21 संपुर्ण जगासाठी नुकसानकारक वर्ष ठरलेय.कोरोना विषाणुजन्य आजार कोविड -19 ने जगाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक तसेच शैक्षणिक जीवनावर मोठा परीणाम केलेला आहे.महाराष्ट्र शासन विद्यार्थी हीत लक्षात घेत शाळा बंद पण शिक्षण सुरु ही ऑनलाईन शिक्षणाची योजना चांगल्या प्रमाणात राबवतांना दिसत आहे. ग्रामीण भागात गरिबीचे व अज्ञानाचे प्रमाण जास्त असल्याने ऑनलाईन शिक्षण ही योजना कुचकामी ठरत असल्याने पालकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वाटत आहे.

छत्रपती कृषी विज्ञान मंडळ संचलित गजानन माध्यमिक विद्यालय राजवड (आदर्शगांव) ता.पारोळा जि.जळगांव या संस्थेचे अध्यक्ष तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दादासाहेब कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी विद्यार्थी हीत डोळ्यासमोर ठेवत माझी शाळा माझी जबाबदारी स्विकारत  शाळेचे इंग्रजी विषयाचे उपशिक्षक श्री.ज्ञानेश्वर पाटील यांना विद्यार्थ्यांसाठी मोबाईलवरील ऑनलाईन शिक्षण व्यतिरीक्त दुसरा पर्याय शोधण्याच्या सुचना केल्यात.

मा.आ.कृषिभूषण साहेबरावदादा पाटील यांच्या मार्गदर्शन व सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी मी इ.8 वी,9वी व 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वत:चे दोन वर्षापुर्वी तयार केलेल्या व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,जळगांव (डायट) च्या प्राचार्या डॉ.सौ.मंजुषा क्षीरसागर मॅडम यांच्या शुभहस्ते प्रकाशित केलेल्या English Language Study Execise Book चे वाटप दि.11ऑक्टोंबर 2020 वार रविवार रोजी संध्याकाळपासुन रात्री उशीरापर्यंत घरोघर जाऊन पालकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

छत्रपती कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील व उपाध्यक्षा तसेच अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ताईसो जिजामाता कृषिभूषण सौ. पुष्पलता साहेबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होऊ नये यासाठी विशेष काळजी घेत विद्यार्थ्यांना मोफत घरपोच सराव पुस्तक पाठविल्याबद्दल तसेच सराव पुस्तक तयार करुन दिल्याद्दल इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री.ज्ञानेश्वर पाटील सरांचे राजवड,खेडीढोक व दगडी सबगव्हाण येथील विद्यार्थी व पालकांनी समाधान धन्यता व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.