एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्‍चीत

2

मुंबई । भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्‍चीत झाला आहे. लवकरच राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती न्यूज-१८ लोकमत या वृत्तवाहिनीने दिली आहे.

खडसे यांच्याकडे पक्षातर्फे मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश निश्‍चित झाला असून याची औपचारीक घोषणा केव्हाही होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर राष्ट्रवादी पक्ष मोठी जबाबदारी टाकणार असल्याचा दावा देखील या वृत्तात करण्यात आला आहे.

खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. अलीकडे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड न झाल्यामुळे खडसे कमालीचे दुखावले गेले होते. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता  एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे. लवकरच खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांच्यावर पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत कोण-कोण राष्ट्रवादीमध्ये येणार याची उत्सुकता लागली आहे.

2 Comments
  1. Pk says

    आता लवकरच मुख्यमंत्री पदी खडसे साहेबांची वर्णी लागेल…

  2. Dilip says

    राष्ट्रवादी ला सतरंज्या उचलणारे “कार्यकर्ते ” हवेचं आहेत. नाथाभाऊ ही जवाबदारी लीलया पेलतील.

Leave A Reply

Your email address will not be published.